Chairman Message

पैशांची बचत आणि कर्ज रूपी मदतीच्या माध्यमातून समाजातील गरजू]गरीब आणि वंचित घटकांच्या जीवनात आर्थिक तेजाचा प्रकाश पसरविणारी संस्था म्हणून सांगली जिल्ह्यातील कुंडल मधील जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था नावारूपाला आली आहे-सहकारातून जनसेवे कडे हे ब्रीद वाक्य प्रमाण मानून संस्थापक चेअरमन संदीप माळी यांच्या सहकार क्षेत्रातील समर्थ नेतृत्वाखाली 27 वर्षांच्या यशस्वी वाटचालीत संस्थेने ग्राहकांसाठी राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करत एक आदर्श निर्माण केला आहे-व्यवसाया बरोबरच जनसेवेचे व्रत अंगिकारलेल्या या संस्थेच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा----

 आर्थिक पातळीवर निराशेच्या गर्तेत सापडून खासगी सावकारांचा आधार शोधणाऱ्या समाजातील काही विशिष्ट घटकांसाठी महाराष्ट्रातील सहकार चळवळ खरोखरच एक वरदान ठरली आहे-सावकारांच्या अवाजवी व्याजाच्या चक्रव्यूहात सापडून अनेकांना आपले जीवन संपवावे लागले आहे-अशा सर्वसामान्य लोकांचे जीवनमान तसेच पत उंचावण्याच्या दृष्टीकोनातून सहकार चळवळींतर्गत गावोगावी अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्थांची उभारणी झाली-ही पतसंस्थाही त्यापैकीच एक

अगदी दोन वर्षांतच जिल्हा कार्यक्षेत्र मिळवून ६ शाखाव्दारे व्यवसाय सुरु करुन अगदी पदार्पनातच पहिल्याच वर्षी नफा मिळवून सभासदांना ११% डीव्हीडड देवून "अ "वर्ग मिळवणारी जिल्हयातील पहिलीच पतसंस्था.